महाउद्योजक फोरम 

मराठी उद्योजकांच्या व्यवसायाला संपूर्ण सपोर्ट करणारी पहिली मराठी कम्युनिटी "महाउद्योजक फोरम. "

image
उद्दिष्ट - 10,000 यशस्वी मराठी उद्योजकांचे 

चला व्यवसाय साक्षर होऊया 

PROBLEM 

मित्रांनो , व्यवसाय करत असताना तुमच्या आजूबाजूला तुम्ही इतर जे व्यवसायिक आहे त्यांच्याकडे बघितले तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, त्यांच्यापैकी प्रत्येकाची कुठे ना कुठे एक बिझनेस कम्युनिटी आहे. जी व्यवसाय वाढीसाठी एकमेकांना मदत करते.
मराठी उद्योजकांसाठीही काही लोक चांगल काम करत आहे.
मात्र विविध व्यवसायांसाठी डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात काम करत असताना आमच्या असं लक्षात आलं, की मराठी माणूस सर्विसेस, मॅन्युफॅक्चरिंग, गुड्स या सगळ्या गोष्टीमध्ये अगदी प्रामाणिक आणि दर्जेदार काम करतो. 

                  मात्र बऱ्याच वेळा पोटेन्शिअल कस्टमरपर्यंत पोहोचण्यासाठी  तो कमी पडतो.
आधुनिक तंत्रज्ञान, क्रिएटिव्ह पब्लिसिटी या गोष्टींचा वापर पाहिजे तितक्या प्रमाणात मराठी उद्योजक करून घेत नाही.
परिणामी पाहिजे तितकी यश शक्य असून सुद्धा पदरात पडत नाही. 

SOLUTION

मराठी नवउद्योजकांना संपूर्ण सपोर्ट आणि मार्गदर्शन करणारा एक परफेक्ट प्लॅटफॉर्म  म्हणून आम्ही " महाउद्योजक फोरम " या कम्युनिटीची उभारणी करत आहोत. ज्यात आपण पुढील 2 वर्षात सुमारे 10,000 मराठी उद्योजकांना सामावून घेणार आहोत.
" महाउद्योजक फोरम "  या कम्युनिटीच्या माध्यमातून आपण एकूण एकूण तीन टप्प्यात काम करणार आहोत. त्याबद्दल डिटेल माहिती About Us सेक्शनमध्ये दिली आहे.

तुम्ही जॉब करत असाल, बिझनेस करत असाल किंवा भविष्यात बिझनेस करायचा विचार करत असाल, तर महाउद्योजक फोरम तुमच्यासाठी एक सर्वोत्तम संधी आहे.
कारण आपल्या मराठीत एक जुनी म्हण आहे. "एकीचे बळ मिळते फळ."

त्यामुळे आपणा सर्वांचे नक्कीच येथे स्वागत असेल.