ज्ञानेश्वर काशिद - ( संस्थापक, महाउद्योजक फोरम ) गेल्या 16 वर्षांपासून डिजीटल मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत. 357+ पेक्षा जास्त उद्योजकांसाठी यशस्वी व्यावसायिक मार्गदर्शन. तसेच स्वत: 8 विविध व्यवसायांत यशस्वीपणे कार्यरत.
START YOUR JOURNEY WITH US
इतकेच नाही तर कम्युनिटी मेंबर्स साठी वेळोवेळी बिजनेस रजिस्ट्रेशनसाठी लागणारी व्यावसायिक कागदपत्रे, लायसन्स यांच्या प्रक्रियेत योग्य माहिती, सरकारी योजना यांची व्यवस्थित माहिती मिळावी यासाठी टोल फ्री नंबर चालू केला आहे. ( 9529632696 )
तसेच दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच साधारणपणे ऑक्टोबर 2026 मध्ये आपण
1. 100 उद्योजकांना प्रत्येकी एक महिना डिजिटल मार्केटिंग सेवा मोफत देणार आहोत.
2. त्याचप्रमाणे एकूण 10 उद्योजकांना व्यवसाय वाढीसाठी बिजनेस फंडिंग देणार आहोत . हे उद्योजक महाउद्योजक फोरमच्या माध्यमातून अनुभवी व्यावसायिक कमिटीच्या गुणांकनानुसार निवडले जातील.
3. तसेच महाउद्योजक फोरम या यूट्यूब चैनलच्या माध्यमातून विविध यशस्वी व्यावसायिकांच्या यशोगाथा आणि बिझनेस आयडिया, मोफतपणे महाउद्योजक फोरम मेंबर्ससाठी उपलब्ध करून देणार आहोत.
4. तसेच जे हजारो व्यावसायिक आपल्या महाउद्योजक फोरमच्यामध्ये समाविष्ट होत आहे, असे सर्व व्यावसायिक एकमेकांना पूरक असतील म्हणजेच एकमेकांना व्यवसाय वाढीसाठी मदत करतील. ( Free Business Listing )
आणि तिसऱ्या टप्प्यात. जानेवारी 2027
1. ज्यांना कुणाला वेगवेगळे व्यवसाय सुरू करायचे आहे, अशा नवउद्योजकांना फूड, वेलनेस, टेक्नॉलॉजी, पर्यटन, एग्रीकल्चर अशा विविध क्षेत्रांतील सुमारे 30 हजार रुपये ते 5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट असणाऱ्या आणि मासिक 10,000 ते 1 लाख रुपये निव्वळ नफा मिळवून देणाऱ्या फ्रेंचाईजी देऊन, पुढील वर्षभरात त्या सर्वांना त्यांच्या व्यवसायात स्थिरस्थावर करायचे आहे.
2. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वेगवेगळ्या होतकरू व्यावसायिकांशी व्यावसायिक भागीदारी करून त्यांच्या व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध करून देणे हे काम सुद्धा महाउद्योजक फोरमच्या माध्यमातून आपण करणार आहोत. ( Business Funding )
हे सर्व करत असताना आपल्याला खूप जास्त लोकांची गरज नाही, प्रामाणिक होतकरू आणि व्यवसाय उत्कर्ष व्हावा असा मानस असणाऱ्या 10,000 मराठी उद्योजकांना आपण सोबत घेतोय. आणि सर्वच्या सर्व उद्योजकांना शाश्वत उत्पन्न कसे मिळेल, यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत.
तुम्ही जॉब करत असाल, बिझनेस करत असाल किंवा भविष्यात बिझनेस करायचा विचार करत असाल तर महाउद्योजक फोरम तुमच्यासाठी एक सर्वोत्तम संधी आहे.
कारण आपल्या मराठीत एक जुनी म्हण आहे.
" एकीचे बळ अन मिळते फळ. "
त्यामुळे आपणा सर्वांचे नक्कीच येथे स्वागत असेल.
धन्यवाद.
ज्ञानेश्वर काशिद ( M.B.A. I.T. )
Founder - महाउद्योजक फोरम